स्विंग ट्रेडिंग(Swing Trading)
स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय? (What is Swing Trading ?) या Trading च्या प्रकाराबाबत माहिती घेण्याआधी आपण बघितले की, प्रत्येकाजवळ उत्पन्नाचे वेगवेगळे Source असणे किती गरजेचे आहे. त्यामुळे उत्पन्नाचा एक खात्रीलायक पर्याय म्हणून Share Market Trading हा चांगला मार्ग आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे आपण Share Market बद्दल असलेले वेगवेगळे समज-गैरसमज बद्दल सुद्धा आपण सविस्तर माहिती घेतली आहे. शिवाय Stock Market मध्ये काम करण्यासाठी आपले Demat Account कुठे उघडावे? त्याची नेमकी Process कशी आहे? हे ही आपणास आता चांगल्या रीतीने माहित झाले आहे.
या आधीच्या लेखात आपण डे ट्रेडिंग (इंट्राडे) काय असते? त्याचे फायदे तोटे आपण पाहिलेत. या लेखात Trading चा एक प्रकार, Swing Trading स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय? (What is Swing Trading ?) बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.
स्विंग ट्रेडिंग ही Stock Market मधील एक Strategi आहे.या प्रकारात शेअर च्या किंमतीतील बदल किंवा ‘स्विंग्स‘ पासून नफा मिळवण्यासाठी एखादा शेअर एक किंवा अधिक दिवसांसाठी Hold केला जातो. Swing Trading हा Intraday Trading व Shortterm आणि Longterm Trading यामधील सुवर्णमध्य आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये.
Swing Trading चे वैशिष्ट्ये
- Swing Trading मधील शेअर्स एका दिवसापेक्षा जास्त व आठ दिवस, पंधरा दिवस किंवा जास्तीत जास्त एक महिना एवढ्या कालावधीसाठी Hold केले जात असतात. परंतु त्यास जास्त काळ ही ठेवता येते.
- या दरम्यान शेअर्स मधील मोमेंटमच्या आधारे किमान नफा प्राप्त करून Trade पूर्ण केला जात असतो.
- सामान्यतः २ टक्के ते ५ टक्के एवढा नफा Swing Trading मध्ये अपेक्षित असतो. मात्र संबंधित शेअर्स मध्ये Positive Moment चांगली असेल तर ५ टक्के पेक्षाही जास्त नफा मिळत असतो.
- सदर उद्दिष्ट सातत्याने पूर्ण केल्यास उत्कृष्ट वार्षिक परतावा मिळवू शकतो.
- उदाहरणार्थ – जर Swing Trading करून विशिष्ट रकमेवर दरमहा 2 टक्के रिटर्न मिळाले आणि असेच सातत्य ठेवले तर वर्षाकाठी रिटर्न ची टक्केवारी 24% एवढी होते.
- Trade मध्ये कधी Entry करावयाची व कधी Exit घ्यायची हे ओळखणे सर्व स्विंग ट्रेडिंग धोरणाचे मुख्य आव्हान आहे. तथापि, नफा मिळविण्यासाठी अगदी अचूक वेळेची आवश्यकता नसते.
- कारण Profit ची टक्केवारी किमान २ टक्के ते ५ टक्के एवढीच असल्याने शेअर्स च्या सामान्य Moment मध्ये ही सदर Profit मिळवणे सहज शक्य होते.
Swing Trading मधील जोखीम
- स्विंग ट्रेडिंगमधील जोखीम सर्वसाधारणपणे बाजारातील अनुमानानुसार असतात. जर शेअर्स चे Momentum ओळखण्यात चूक झाली किंवा Stock Market अचानक विरूद दिशेने गेले तर मात्र Swing Trading मध्ये ही काही प्रमाणात तोटा होऊ शकतो.
- शेअर्स चे Momentum अपेक्षित दिशेच्या विरुद्ध गेल्याने Position जर जास्त दिवस Hold करावी लागली तर भांडवल अडकून पडते. त्यामुळे आपला व्यवहारावर परिणाम होत असतो.
स्विंग ट्रेडिंग वि. Intraday Trading (डे ट्रेडिंग)
- स्विंग ट्रेडिंग आणि डे ट्रेडिंग आपल्याला सारख्याच पद्धती आहेत अस वाटू शकते परंतु या दोघांमधील मुख्य फरक आहे ,तो म्हणजे – वेळ.
- Intraday Trading (डे ट्रेडिंग) ही संबंधित दिवसा पुरतीच मर्यादित असते तर Swing Trading ही काही दिवस किंवा आठवडे साठी असू शकते.
- Intraday Trading मध्ये कमी कालावधी साठी Position घेतल्या जात असतात. म्हणजे सामान्यत: रात्रभर पोझिशन्स ठेवत नाहीत. परिणामी, काही तासांनंतर येणार्या बातम्यांमधील घोषणांमुळे किंवा एखाद्या Market Trigger मुळे किंमतीत होणारा विरुद्ध बदल टाळता येतो. दरम्यान, Swing Trading मध्ये मात्र अश्या Market Trigger बाबत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे .
- Intraday Trading मध्ये कमी कालावधीमुळे एक अतिरिक्त जोखीम आहे. Swing Trading मध्ये मात्र ही मर्यादा येत नाही.
- Intraday Trading मध्ये Broker Margin देत असल्याने कमी भांडवलात मोठा व्यवहार करता येतो. Swing Trading मध्ये आपल्याजवळ जेवढी रक्कम आहे तेवढ्याचाच व्यवहार करता येतो,Margin मिळत नाही.
- Margin मुळे Intraday Trading मध्ये नफा व तोट्याचे प्रमाण खूप मोठे असू शकते, मात्र Swing Trading मध्ये Margin मिळत नसल्याने नफा व तोट्याचे प्रमाण मर्यादित असते.
- Intraday Trading मध्ये Margin घेऊन व्यवहार केल्याने Position Convert करण्यासाठी (उदाहरणार्थ Intraday Trading चा व्यवहार Positional Trade मध्ये Convert करणे) अतिरिक्त भांडवल लागत असल्याने प्रसंगी Loss बुक करून Trade पूर्ण करावा लागतो.
- मात्र Swing Trading मध्ये जेवढे भांडवल तेवढयाचाच व्यवहार केला असल्याने Position Convert (उदाहरणार्थ Swing Trading ची Position Shortterm किंवा Long Term मध्ये Convert करणे) करण्यासाठी वेगळे काही करावे लागत नाही. ते सहज शक्य आहे.
- Intraday Trading साठी ब्रोकरेज हे कमी प्रमाणात लागत असते. त्यामानाने Swing Trading मध्ये शेअर्स ची डिलिव्हरी घेतली जात असल्याने ब्रोकरेज थोडे जास्त लागते.