स्टॉक मार्कट मध्ये काम सुरु करण्यापूर्वी काय करू नये ?
या आधीच्या लेखांमध्ये आपण आजच्या परिस्थितीत प्रत्येकाला second income source का आवश्यक आहे ?. त्यासाठी स्टॉक मार्केट हा पर्याय कितपत योग्य आहे व त्यासंदर्भात सर्वसामान्यांच्या मनात असलेले समज यावर आपण चर्चा केलीय. स्टॉक मार्कट गुंतवणूक – काळजी, हे आज आपण समजून घेणार आहोत.
तर मग आपण एकदाचा स्टॉक मार्केट मध्ये व्यवहार करण्याची मनाची तयारी केली व तसे ठरवल्या नंतर सुरुवात नेमकीकशी करावी हा प्रश्न येतो. मात्र मित्रांनो सुरुवात करण्याआधी आपण कोणत्या बाबी टाळल्या पाहिजेत व सुरुवातकेल्यानंतर कोणती सावधगिरी बाळगली पाहिजे याबाबत या लेखात आपण माहिती घेणार आहोत.
सर्वसाधारण पणे स्टॉक मार्केट चा व्यवहार सुरु करण्यासाठी आपण आपले डिमॅट अकाउंट ओपन केल्या बरोबरआपल्याला अनेक फोन कॉल्स यायला सुरवात होते. कोणी म्हणते कि आम्ही फ्री टिप्स देऊ तर कोणी म्हणते आम्ही फ्रीमध्ये तुमचा पोर्टफोलिओ मॅनेज करू. आपणास अश्या लोकांपासून सावध राहणे गरजेचे आहे. अश्या एजन्सी कडून टिप्सवगैरे घेऊन आपण प्रॉफिट मध्ये येण्याची शक्यता ही अजिबात नसते. म्हणून आपल्याला येणाऱ्या अशा कॉल्स ला नम्रपणे नकार द्यावा.
काही लोकांनी इकडून तिकडून मार्केट बद्दल माहिती घेतलेली असते आणि अश्या माहितीवर डोळे बंद करून विश्वास ठेवला जातो. मार्केट मधून रातोरात लखपती, करोडपती होता येते, अमुक व्यक्ती दररोज ट्रेडिंग करून हजारो , लाखोरुपये नफा रोज कमावतो,अमुकने ट्रेडिंग करून एवढा पैसे कमावला कि त्याने भरपूर पॅकेज असलेली नोकरी सोडली अशाएक ना अनेक बाबी, माहिती एकूण त्याच प्रकारचे स्वप्न उराशी बाळगून अनेक जण या क्षेत्रात येत असतात. आपल्या हीमनात अश्या गोष्टी असतील तर सर्व प्रथम आपण थोडा pause घ्यावा आणि विचार करावा कि असे खरोखर शक्य आहेका ? आणि शक्य असेल तर आपल्या जवळ तेवढे ज्ञान, कौशल्य आज रोजी आहे का ? तरी मित्रांनॊ अशा स्वप्नजंजाळात न अडकता व अति महत्वाकांक्षी न होता वास्तविक परिस्थितीचे भान ठेऊन वार्षिक 15 ते 24 टक्के रिटर्न मिळेलही अपेक्षा ठेऊनच मार्केट मध्ये यावे. हाच दृष्टीकोन आपणास मार्केट मध्ये यशस्वी होण्यास मदत करेल.
वेगवेगळ्या माध्यमातून स्टॉक मार्केट बद्दल माहिती घेऊन फक्त पैसे कमविणे एवढ्याच एकमात्र उद्देशाने मार्केट मध्ये येतअसतात. त्यांची नवीन ज्ञान घेऊन प्रगती करण्याची तयारी नसते. असे काही लोक आपल्या एखाद्या मित्राला किंवाओळखीच्या व्यक्तीला जो आधीपासून मार्केट मध्ये आहे त्याला सांगतात की मी एवढे भांडवल देतो. ते मार्केट मध्ये गुंतवव आलेल्या नफ्यातून तू एवढी टक्केवारी घे व उर्वरित मला दे. म्हणजे स्वतः कोणतीही मेहनत करायला सदर व्यक्ती तयारनसतो. जर आपण ही असे काही करण्याच्या विचारात असाल तर आपणास विनंती की आपण या व्यवहारात येऊच नये. कारण दुसऱ्याच्या भरवश्यावर आपली प्रगती कधीच होत नसते. सुरवातीला जरी आपल्याला काही प्रमाणात यश दिसतअसले तरी ते चिरकाल टिकणारे नसते. जो व्यक्ती आपले पैसे मार्केट मध्ये गुंतवत आहे त्याची नेमकी स्ट्रॅटेजि कोणती, त्याचे analysis कसे आहे याबद्दल आपण पूर्णपणे अंधारात असतो. म्हणून सरतेशेवटी आपले नुकसानच होणार असते. म्हणून असे पाऊल आपण चुकूनही उचलू नये.
वेगवेगळ्या सोशल मेडिया च्या माध्यमातून बघायला, ऐकायला मिळते की अमुकने 10 वर्षापूर्वी एक शेअर 1 रु भावानेघेतला आणि आज तोच शेअर 1000 रु झाला आहे. मग मार्केट मध्ये येत असलेले नवीन गुंतवणूकदार असेच कमीकिमतीचे शेअर्स शोधतात व कोणतेही Analysis न करता आपली रक्कम गुंतवतात. कालांतराने गुंतवलेली रक्कम निम्मेसुद्धा राहत नाही तेव्हा मार्केट ला दोष देतात.
आपल्याला जेव्हा असे शेअर्स घ्यायचे असतील तेव्हा आधी आपण संबंधित कंपनीचे पूर्णपणे Fundamental Analysis केले पाहिजे. सदर कंपनी खरोखर ग्रोथ होणारी आहे का याचा सविस्तर अभ्यास केल्यानंतरच तिच्यात गुंतवणूक केलीपाहिजे. अशा शेअर्सना मार्केट मध्ये Penny शेअर्स म्हणतात. अशा शेअर्स पासून ही नवीन गुंतवणूकदारांनी सावध राहणेगरजेचे आहे.
अनेक एजन्सी किंवा व्यक्ती वेगवेगळे Software तयार करून नवीन गुंतवणूकदारांना विकत घेण्यासाठी प्रलोभन दाखवतअसतात. आपल्या Software ची जाहिरात करीत असताना ऑटोमॅटिक Buy व Sell सिग्नल मिळतील, एवढे टक्के नफामिळेल असे सांगितले जाते. मात्र नवीन गुंतवणूकदारांना हे सिग्नल कसे Generate होतात याची बेसिक माहिती नसते. त्यामुळे त्यामागचे लॉजिक न कळल्याने चुकीची Entry किंवा Exit होऊ शकते. पर्यायाने आर्थिक नुकसान होण्याचीशक्यता असते. म्हणून सुरवातीच्या काळात असे Software विकत न घेता सर्व बेसिक ज्ञान मिळविण्यासाठी अभ्यास वमेहनत घेण्यावर भर दिला पाहिजे.
तर मित्रांनॊ स्टॉक मार्केट मध्ये येण्यापूर्वी आपण काय काळजी घेतली पाहिजे व सुरुवात केल्यानंतर कोणत्या बाबीटाळल्या पाहिजेत याबाबत आपण या लेखात माहिती घेतली. स्टॉक मार्कट गुंतवणूक – काळजी . स्टॉक मार्केट मध्ये अजून कोणत्या बाबी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत हे जस जसे आपण वेगवेगळ्या विषयांची माहिती घेऊ तेव्हा जाणून घेत जाऊ.