स्टॉक मार्केट समज – गैरसमज

 स्टॉक मार्केट आपण नेहमी आणि दररोज ऐकत असणारा शब्द. आज सेंसेक्स कोसळला आज सेन्सेक्स ने भरारी घेतली. गुंतवणूकदारांचे लाखो रुपये पाण्यात असे मथळे असलल्या बातम्या वर्तमान पेपर टी व्ही वर आपण बघत असतो पाहतअसतो. थोडा वेळ आपण त्यावर आपले मत व्यक्त करतो आणि लगेच ती बातमी तो विषय विसरत असतो. मात्र कधीआपण विचार करतो का कि आपण हि स्टॉक मार्केट मध्ये व्यवहार करावा ? मला वाटते कि आपल्या पैकी बोटावरमोजता येतील एवढेच व्यक्ती असतील जे हा विचार करत असतील. प्रत्यक्षात तो विचार अंमलात आणणारे तर विरळच. म्हणून आज आपण या लेखात आपण स्टॉक मार्केट समज – गैरसमज समजून घेणार आहोत.

असे का होत असेल ? 

त्याला कारणीभूत आहे आपली मानसिकता.आणि आपली अशी मानसिकता तयार होण्यामागे आपण स्टॉक मार्केट बद्दलआपला परिवार,मित्र,समाज यांच्या कडून ऐकलेले मतं. त्यांचा पगडा आपल्या मनावर बसला आणि आपण त्याच पद्धतीनेविचार आणि आचार करू लागलो.

स्टॉक मार्केट बद्दल सर्वसाधारण पणे खालील समज आहेत.

  • स्टॉक मार्केट म्हणजे सट्टा आहे.
  • स्टॉक मार्केट मध्ये फक्त नुकसान होतेलोक बरबाद होतात 
  • स्टॉक मार्केट मध्ये व्यवहार करणे सर्वसामान्यांचे काम नाही 
  • स्टॉक मार्केट मध्ये काम करण्यासाठी खूप techniqual ज्ञान  हुशारी असावी लागते

हे सर्व समज कितपत योग्य आहेत ते बघूया.

स्टॉक मार्केट म्हणजे सट्टा आहे.

स्टॉक मार्केट चा व्यवहार NSE  BSE या दोन EXCHANGE च्या माध्यमातून चालत असतो. या सर्व व्यवहारावर लक्षठेवण्यासाठी  नियमन करण्यासाठी SEBI नावाची एक REGULATOTY सरकारी संस्था भारत सरकारने सुरु केलीआहे. म्हणजेच स्टॉक मार्केट मध्ये होत असलेले सर्व व्यवहार सरकारी नियम कायदे पाळूनच होत असतात. थोडक्यातस्टॉक मार्केट एक मान्यताप्राप्त  सरकारी व्यवहार आहेसट्टा नव्हे.

स्टॉक मार्केट मध्ये फक्त नुकसान होतेलोक बरबाद होतात.

स्टॉक मार्केट मध्ये जर स्वतः व्यवस्थित अभ्यास करून  काही स्व आचारसहिंता पाळून जर व्यवहार केला तर नक्कीचआपल्याला चांगले रिटर्न मिळू शकतात. ज्यांनी ही आज पर्यंत मार्केट मध्ये पैसे गमावले आहेतत्याला कारणीभूत म्हणजेअति लोभ किंवा अति भीती. त्यालाच मार्केट च्या भाषेत FEAR आणि GRID असे संबोधले जाते. त्यांच्या बद्दल आपणपुढील काही लेखात माहिती घेणारच आहोत. स्टॉक मार्केट चा इतिहास जर आपण बघितला तर मार्केटने गुंतवणूकदारांनावार्षिक किमान 12 ते 15 टक्के रिटर्न सहजरित्या दिलेला आहे. जर अजून थोडा अभ्यास करून जर व्यवहार केला तर हेचरिटर्न वार्षिक 20 ते 25 टक्क्याच्या घरात जाते. म्हणजेच स्टॉक मार्केट मध्ये फक्त नुकसान होतेलोक बरबाद होतात हासमज साफ खोटा आहे. 

स्टॉक मार्केट मध्ये व्यवहार करणे सर्वसामान्यांचे काम नाही. 

सन 2000 पूर्वी हा समज काही अंशी खरा होता. कारण तेव्हा स्टॉक मार्केट मधील सर्व व्यवहार हा प्रत्यक्षात होत होता. मात्र सन 2000 नंतर परिस्थिती बदलत गेली. डिजिटल क्रांती झाली. स्टॉक मार्केट चे सर्व व्यवहार ऑनलाईन झाले. लोकांजवळ ही मोबाईल आले. 

आज तर अशी परिस्थिती आहे कीप्रत्येक माणसाजवळ मोबाईल आहे. जगातील सर्वात स्वस्त इंटरनेट भारतात उपलब्धआहे. आता घर बसल्या फक्त एका मोबाइलच्या मदतीने स्टॉक मार्केट मध्ये व्यवहार करता येऊ शकतात.त्यामुळे स्टॉकमार्केट मध्ये व्यवहार करणे आता सर्वसामान्यांनाही शक्य झाले आहे.

स्टॉक मार्केट मध्ये काम करण्यासाठी खूप techniqual ज्ञान  हुशारी असावी लागते.

ज्या व्यक्तीला स्मार्टफोन वापरता येतो  ज्याला लिहिता वाचता येते असा कोणताही व्यक्ती स्टॉक मार्केट मध्ये कामकरून चांगल्या प्रकारे नफा कमावू शकतो. थोडासा अभ्यास आणि मेहनत घेतली तर स्टॉक चे fundamental analysis techniqual analysis अगदी सहजरित्या कोणीही करू शकतो. थोडक्यात स्टॉक मार्केट मध्ये काम करण्यासाठी खूपचtechniqual ज्ञान  हुशारी हवीच असे नाही.

      या व्यतिरिक्त अनेक समज लोकांमध्ये आहेत. मात्र वरील मुद्द्याच्या चर्चेतून आपणास नक्कीच लक्ष्यात आले असेल किस्टॉक मार्केट चा व्यवसाय हा नक्कीच एक कायदेशीरसुरक्षित आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात असणारा व्यवसायआहे. योग्य दिशेने काम केले तर त्याच्यात नक्कीच आपणास चांगले यश मिळेल असा आत्मविश्वास या लेखमालेतील पुढील लेख अभ्यासल्यावर आपणास येईल याची खात्री आहे.

Scroll to Top