सर्वांना नमस्कार 🙏 महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने संपूर्ण राज्यात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्याचे प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांना विविध स्पर्धांचे प्रारूप,नियमावली व बक्षिसे निश्चित करण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, धुळे यांना (१) सुडोकू (२) क्रॉसवर्ड/ शब्दकोडी (३) प्रश्नमंजुषा या तीन स्पर्धांचे नियम,प्रारूप तयार करायचे आहेत.
त्या दृष्टीने १) सदर स्पर्धा ही शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी अशी एकत्रित घेण्यात येईल त्यात कोणतेही गट असणार नाहीत.२) जिल्हास्तर प्रत्येक स्पर्धेतून एकच विजेता असेल. खालील विषयात आपली बहुमूल्य मते A4 कागदावर व्यवस्थित टाईप करुन अथवा आपल्या हस्ताक्षरात लिहून पुरविलेल्या लिंक मध्ये pdf स्वरूपात दिनांक २५ डिसेंबर पर्यन्त अपलोड करावीत.
आपले मत खालील मुद्यांना अनुसरून असावे.
1) स्पर्धा केंद्र,तालुका,जिल्हा,विभाग, राज्यस्तरावर कशा प्रकारे आयोजित करावी?
2) स्पर्धांचे प्रारूप कसे असावे ?
3) स्पर्धेसाठी वेळ किती असावा?
4) स्पर्धेसाठी विशिष्ट विषय असावेत का? असल्यास कोणते?
5) स्पर्धकांविषयी कोणते नियम बनवता येतील?
6) प्रत्यक्ष स्पर्धेमध्ये कोणते नियम असावेत
7) केंद्र व तालुका स्तरावर किती क्रमांक असावेत 8)विविध स्तरावर काय बक्षिसे असावीत?
9) एका केंद्रासाठी किती खर्च अपेक्षित आहे
10) एका तालुक्यासाठी किती खर्च अपेक्षित आहे
11) स्पर्धांचे मूल्यमापन कसे करावे?
12) त्यासाठी निकष कोणते असावेत?
13) स्पर्धांसाठी परीक्षक कोणते असावेत? त्यांची पात्रता काय असावी?परीक्षकांसाठी विविमानधन किती असावे?
14) या व्यतिरिक्त आणखी आपल्या सूचना नोंदवाव्यात